फक्त मराठीवर दिवाळी निमित्त खास चित्रपटांचा नजराणा

आनंदाची पुनरावृत्ती होत राहण्याचे सण हे एक निमित्त असते. दिवाळी म्हणजे करमणुकीच्या कार्यक्रमांची मांदियाळी. 'दिवाळी सण मोठानाही आनंदाउत्साहा तोटाअस म्हणंत गेल्या काही वर्षापासून दिवाळी सणाच्या आनंदात छोटा पडदाही सामील झाला आहे. अनेक वाहिन्या केवळ दिवाळी निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करतात. प्रेक्षकांची यंदाची दिवाळी स्पेशल व्हावी यासाठी फक्त मराठी  वाहिनीने पाच मनोरंजनपर चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे.
ढोलकीकाकणनवरी मिळे नवऱ्यालाभाऊबीजकाळूबाई पावली नवसाला या पाच मराठी चित्रपटांचा आस्वाद मंगळवार १७ ऑक्टोबर ते शनिवार २१ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ वा. घेता येईल. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं औचित्य साधत हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. पाडव्याला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ तर भाऊबीजेला ‘भाऊबीज चित्रपट दाखवण्यात येईल. मनोरंजनाच्या माध्यमातून यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास करण्याचा फक्त मराठी चा प्रयत्न आहे. दिवाळीचं सेलिब्रेशन व सिनेमांची मेजवानी हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खास धमाका ठरेल. फक्त मराठी वाहिनीने नेहमीच प्रेक्षक पसंतीचा विचार केला आहे. या सणाच्या निमित्ताने प्रेक्षकांशी असलेलं आमचं नातं अधिक दृढ व्हावं व प्रेक्षकांच्या सणाचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी आम्ही ही दिवाळी भेट प्रेक्षकांसाठी आणली असल्याचे फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी सांगितले.  

Subscribe to receive free email updates: