'बॉईज'ची नाबाद पन्नाशी


'आम्ही लग्नाळू' म्हणत तरुणाइंच्या मनात धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या 'बॉइज' सिनेमाला नाबाद ५० दिवस पूर्ण झाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाले असले तरी, युथने डोक्यावर उचलेला हा सिनेमा आजही सिनेमागृहात हाउसफुल पाहिला जात आहे. 'बॉईज' ची रंगीत दुनिया मांडणाऱ्या या सिनेमाचे महाराष्ट्रात १२५ चित्रपटगृहांमध्ये १५०० हुन अधिक शोज सुरु आहेत. एव्हढेच नव्हे, तर त्याची ख्याती सिंगापूरपर्यत पसरली असून, तेथील स्थानिक मराठीभाषिक प्रेक्षकांच्या विशेष मागणीमुळे 'बॉईज' सिनेमाचे खास स्क्रीनिंग सिंगापूरमध्ये ठेवण्यात आले होते. 
तीन मित्रांचे विश्व मांडणा-या या सिनेमात विनोदाचा एक वेगळाच दर्जा पाहायला मिळतो. मिष्कील आणि तरुणाईला आवडेल अश्या शाब्दिक कोट्यांचा यात भरभरून वापर करण्यात आला असल्यामुळे, हा सिनेमा विनोदाचा उच्चांक गाठतो. सुप्रसिद्ध संगीतकार आणि सिनेदिग्दर्शक अवधूत गुप्ते यांची प्रस्तुती या सिनेमाला लाभली असून, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित 'बॉईज'या सिनेमाचे विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शन केले आहे. पार्थ भालेराव , सुमंत शिंदे, आणि प्रतिक लाड या तिकडींच्या 'बॉईज'गिरी वर आधारलेला हा सिनेमा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट आहे.

Subscribe to receive free email updates: