‘जीवनरंग’


दिनांक        -      ८ ऑक्टोबर, २०१७
वेळ           -      सकाळी १० ०० वा.
स्थळ         -      स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहदादर (प.)
निसर्ग जसा मुक्त हस्ताने सप्तरंगांची उधळण करून अवघ्या सृष्टीला नवचैतन्य देतो अगदी तशाच प्रकारे सुंदर विचारांचे देणे समाजात परावर्तित करणे हाच गाभा उराशी बाळगून राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक‘ लाभलेले पोलीस निरीक्षक संजय गोविलकर व त्यांचे सहकारी यांनी एकत्र येऊन जीवनरंग या सामाजिक संस्थेची २००८ मध्ये स्थापना केली. त्या अनुषंगाने जीवनरंगने विविध लोकपयोगी उपक्रम राबवले ज्यात खेडोपाडी शवदाहिनी बसवल्या, तसेच भारतजोडो या अभियानाअंतर्गत भारतीय हीच आपली जात आणि मानवता हाच आपला धर्म या उक्तीची कास धरून जीवनरंग सदस्यांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले.
गेल्या दहा वर्षांत संस्थेने लाईफ रिचार्ज या उपक्रमामार्फत अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन लाखो लोकांपर्यंत पोहोचवले. ज्यात ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग, अॅडगुरु भरत दाभोळकर, शहीद हेमंत करकरे, समाजसेविका सिंधूताई सपकाळ, सरकारी वकील उज्ज्वलजी निकम, गानसम्राज्ञी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर, निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार,प्रसिद्ध उद्योजक मंगलप्रभातजी लोढा, स्वप्नील जोशी आदींनी आपले प्रेरणादायी विचार जीवनरंगच्या मंचावर दिलखुलासपणे सांगितले.
लाईफ रिचार्जच्या जीवन मालिकेला साजेल असेच पुढील पुष्प आम्ही लवकरच गुंफत आहोत. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण लठ्ठपण व मधुमेह या विकारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे, विनासायास वेटलॉस या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेने ज्येष्ठ वैज्ञानिक व संशोधक डॉ. जगन्नाथ (M.B.B.S., M.D.) यांना आमंत्रित केले आहे. तसेच लेखक व साहित्यिक असणाऱ्या पोलीस अधिकारी श्री. संजय गोविलकर यांच्या मनातील कचरा काढून टाकण्यास प्रवृत्त करण्याचा फ्लश - फेकून द्या कचरा मनातला या कथा संग्रहाचा लोकार्पण सोहळाही आयोजित करण्यात आलेला आहे.
‘जीवनरंग’चा प्रत्येक कार्यक्रम हा स्पेशल असतोआमचे नातेवाईक, मित्रमंडळी, पोलीस सेवेतील अनेक अधिकारी, अनेक डॉक्टर, कलाकार, विद्यार्थी, अनेक शाळांचे मुख्याध्यापक, विश्वस्त, पत्रकार,उद्योजक आणि अनेक उच्चविद्याविभूषित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. तेव्हा आपणही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
ज्याप्रमाणे आपला मोबाइल सतत चार्ज राहिला पाहिजे म्हणून आपण घर, गाडी, कार्यालय अशा प्रत्येक ठिकाणी चार्जर ठेवतो हे कमी की काय म्हणून पॉवर बँकही ठेवतो त्याचप्रमाणे स्वतःला चार्ज ठेवण्यासाठी या वेगवान युगातील आपली स्वप्ने साकार करण्यासाठी लाइफ रिचार्ज या दर तीन महिन्यांनी होणारा उपक्रम म्हणजे या धकाधकीच्या जीवनात सर्वांना ध्येयाच्या दिशेने नेणारा सकारात्मक विचारांचा प्रवाह आहे. या प्रवाहात सामील होण्यासाठी व कार्यक्रमात आपली उपस्थिती कळवण्यासाठी संपर्क करा -सुनयना सावंत – ९६६४३७५५०१
आपले स्नेहांकित,
अरुण सिंह (९८२०८३८२७५) - व्यवस्थापक
जीवनरंग संस्था, वरळी

Subscribe to receive free email updates: