कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या रहिवाशी संघावर आस्तादने नाराजगी व्यक्त केली !

मुंबई१९ एप्रिल २०१८ : बिग बॉस घरातील नॉमिनेट सदस्यांसाठी प्रार्थना यज्ञ या कार्याची घोषणा बिग बॉसने केली, नॉमिनेट सदस्यांना सदईच्छा देण्यासाठी हा यज्ञ आयोजित केला. हा टास्क रात्रभर चालला. आस्ताद काळेने हा टास्क उत्तमरीत्या पार पाडून बाजी मारली,त्याच्या बरोबर पुष्कर जोगभूषण कडू याने देखील चांगल्या प्रकारे हा टास्क पार पाडला. टास्क रात्रभर चालेल्यामुळे जे सदस्य रात्रभर यज्ञ कुंडाचं जवळ बसले होते त्यांना पूर्ण दिवस झप मिळालेली नाही त्यामुळे त्यांची चीडचीड होत होणे अगदीच सहाजिक आहे. आस्ताद काळेभूषण कडू जवळपास संपूर्ण दिवस झोपले नव्हेतत्यांच्यासोबत पुष्कर देखील जागत होता. हा पहिला टीम टास्क असल्याकारणाने तो यशस्वीरीत्या पूर्ण करणे म्हत्वाचे होते.
या टीम टास्क दरम्यान आस्ताद काळे संपूर्ण रहिवाशी संघावर प्रचंड नाराज असल्याचे दिसून येणार आहे. या टास्कच्या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये आस्ताद काळेने केलेल्या आरोपामुळे मेघाला खूपच वाईट वाटले आणि तिला रडू कोसळले. कारणआस्तादचे म्हणणे आहेकि मेघाने आम्हाला प्रोत्साहन न देता ती निघून गेली. आस्तादने मेघावर नव्हे तर संपूर्ण टीम वर आपली नाराजगी व्यक्त करणार आहे. 
आस्तादचे एकच म्हणणे होतेआपण या मराठी बिग बॉसच्या घरामध्ये सगळे एका कुटुंबासारखे रहाणार आहोत. पण, जेंव्हा घरामधील काही सदस्य रात्रभर फक्त चहा वर जागलेआणि पहिला टीम टास्क पूर्ण केला. सकाळी उठल्यानंतर जेंव्हा सगळे उठले तेंव्हा कोणी तसदी देखील घेतली नाही येऊन आम्हाला विचारायची किंवा कसे आहात असं विचारण्याची. मेघा बरोबर संपूर्ण टीमवर आस्तादाने नाराजगी व्यक्त केली.

Subscribe to receive free email updates: