"वर्षा उसगावकर व अमितराज" हे दुनियादारी नंतर जळू मध्ये 4 वर्षानंतर पुन्हा एकत्र !


निर्माते अजितकुमार धुळे आणि श्रीनिवास बिहाणी यांच्या 'साई नक्षत्र प्रोडक्शन' निर्मित, जळू चित्रपटाचा मुहूर्त सोहोळा नुकताच पार पडला. यावेळी अभिनेत्री  वर्षा उसगावकर, रश्मी राजपूत, अभिनेते कमलेश सावंत, संगीत दिग्दर्शक अमितराज उपस्थित होते. 
एकविसाव्या शतकातील स्त्रीने स्वत:ची शक्ती ओळखली आहे. स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती समजली जात असली तरीही आजच्या आधुनिक युगात स्त्री  डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, वा आमदार अश्या महत्वाच्या पदांवर काम करून पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत असलेली दिसून येते. आजची स्त्री स्वतःची कर्तबगारी जगाला दाखवून देण्यास सज्ज आहे. अशावेळी अनेक सामाजिक आव्हानांचा तिला सामना करावा लागतो. समाजावरील पुरुषप्रधान संस्कृतीचा असलेला प्रभाव अजूनही स्त्रीभ्रूण हत्या, लैंगिक शोषण, अॅसिड अटॅक या स्वरूपात स्त्री वर्गाला अत्याचार करू पाहतो. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त होणे म्हणजेच महिला सक्षमीकरण असे मानणाऱ्या विसाव्या शतकातील या समाजाला महिला सक्षमीकरण म्हणजे नक्की काय? महिला सक्षमीकरण व महिला सशक्तीकरण होणे ही काळाची गरज कशी आहे? या विषयावर भाष्य करून बदलत्या समाजाबरोबर स्त्रियांना त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य, अधिकार, महत्वाकांक्षा, दृष्टिकोन यांची जाणीव करून देणारा "जळू" हा वास्तववादी चित्रपट समस्त स्त्री वर्गाला प्रेरणादायी ठरणार आहे. 
भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक स्त्री ला स्वतः च्या अस्तित्वाचा शोध घेण्यास भाग पडणाऱ्या, निर्माते अजितकुमार धुळे आणि श्रीनिवास बिहाणी यांच्या 'साई नक्षत्र प्रोडक्शन' निर्मित, "जळू" चित्रपटाची कथा अजितकुमार धुळे आणि सागिरा पटेल यांची असून पटकथा तेजस तुंगार यांनी लीहिली आहे. सी.आय.डी, आहट, मधली सुट्टी, कॉमेडी एक्सप्रेस यांसारख्या एका पेक्षा एक मालिकांचे संकलक निखिल भोसले यांच्या सोबत अजित कुमार धुळे दिग्दर्शनाची जबाबदारी पार पडणार आहेत. चित्रपटातील गीते अजितकुमार धुळे, किशोर गागरे, किरण डोंगर दिवे, महेश ससाणे यांनी लिहिली असून नितीन चांदोरकर हे कार्यकारी निर्मिता म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत. चित्रपटातील सर्व गाणी संगीत दिग्दर्शक अमितराज संगीतबद्ध करणार असून, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर त्याचे नृत्यदिग्दर्शन करणार आहे. दुनियादारी चित्रपटानंतर तब्बल ४  वर्षांनी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि संगीत दिग्दर्शक अमितराज 'जळू' चित्रपटाच्या निमित्ताने आपणास पुन्हा एकत्र काम करताना दिसून येणार आहेत. 

"Together again 4 years later in the year after the leechusagavakara and amitaraja" This worldliness!
Producer ajitakumara Dhule and Srinivas bihani of Sai Nakshatra production, produced, was just across the leech film Muhurt Soho. the actress   Usagavakara year, Rashmi Rajput, Kamlesh Sawant actor, music director amitaraja were present.
The twenty-first century is called self-powered woman. The woman in the sacrifice, humility, faith and sujanapana be considered idol that still can be seen in today's modern age, a woman trying to capture the doctors, engineers, scientists, bureaucrats, legislators and women at areas traditionally considered to be men's work important positions. Today she is ready to give them a sense of their own accomplishments. Then her face many social challenges. Samajavarila male dominated culture that still affect female infanticide, sexual harassment, acid attacks and violence on a woman to look at the class or form. What exactly is this male dominated society like India, the empowerment of women in the twentieth century as the women in the empowerment of women to get the right to take decisions independently? How is women empowerment and the need of the hour to the empowerment of women? All on the subject of their individual woman, women the right to samajabarobara changing the comment, ambition, by a sense of perspective "leech" This film is going to be realistic and inspiring class.

But imagine like to take part in the search itself of existence to every woman around the world, the creators of ajitakumara in the Dhule and Srinivas bihani of 'Sai Star Production "Made," leech "story ajitakumara Dhule and Sagir Patel script Tejas tungaare has lihili. Siayadi, wounded, recess, Comedy Express, such as the one over the responsibility Ajit Kumar Dhule direction with a series of Collector Nikhil Bhosle than one. Film songs ajitakumara Dhule, teen gagare, shaft mount lights, written by Mahesh Nitin kite candorakara be held responsible for this as the executive production. All the songs composed by music director will amitaraja film, dance director phulava Khamakar his will Choreography. After nearly 4 years of worldliness film actress of the year on the occasion of usagavakara and music director amitaraja 'leech' will appear in the film, you have to work together again.

Subscribe to receive free email updates: