विदेशात ‘हाफ तिकीट’चा डंका

लहान मुलांचं भावविश्व मोठ्या कॅनव्हासवर मांडत दिग्दर्शक समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेल्या हाफ तिकिट’ या मराठी चित्रपटाने विदेशातही मराठीचा झेंडा फडकवला आहे. भारतीय प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवणारा हाफ तिकिट हा चित्रपट कॅरॉसेल इंटरनॅशनल ड्यू फिल्म डे रिमोस्की (Carrousel international du film de Rimouski) या चित्रपट महोत्सवातही कौतुकास पात्र ठरला आहे.  भारतामध्ये जुलै २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या हाफ तिकिटने प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंचत्यासोबत बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. आज विदेशातही या चित्रपटाचा डंका वाजतोय. कॅनडामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या कॅरॉसेल इंटरनॅशनल ड्यू फिल्म डे रिमोस्कीमध्ये हाफ तिकिटने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. हा चित्रपट महोत्सव लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येतो. रिमोस्कीच्या अनेक शाळांमध्ये ‘हाफ तिकिट चित्रपट दाखवण्यात आला असून  यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिग्दर्शक समित कक्कड यांनी उत्तंर दिली. या महोत्सवानंतर टोराण्टो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवासाठी (Toronto from Rimouski for the 17th Reelworld film festival 2017) हाफ तिकिट जाणार आहे.
या चित्रपटात कक्कड यांनी मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन लहान मुलांची मांडलेली गोष्ट लहानग्या प्रेक्षकांसोबतच मोठ्यांनाही भावली. या शोला समित कक्कडही उपस्थित होते. त्यांनी प्रेक्षक तसेच तिथल्या चित्रपट जाणकारांशी संवाद साधत या चित्रपटामागील भूमिका स्पष्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शुभम मोरे आणि विनायक पोतदार या बालकलाकारांच्या अभिनयाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं. याशिवाय हाफ तिकिटच्या यशस्वी दिग्दर्शनाबद्दल यांचं अभिनंदनही केलं.

व्हिडिओ पॅलेसची निर्मिती असलेल्या या चित्रपटात समित कक्कड यांनी जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा अचूक मेळ साधत दोन लहानग्यांची धडपड सादर केली आहे. या चित्रपटात भाऊ कदमप्रियांका बोसउषा नाईकशशांक शेंडेजयवंत वाडकरकैलाश वाघमारे आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘काक मुत्ताई’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे अधिकृत रूपांतरण असलेल्या हाफ तिकीट’ या सिनेमाने आजवर बऱ्याच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्समध्ये बाजी मारली आहे.
International festivals:

'Official Selection 38th Cairo International Film Festival 2016'

'Official Selection 28th Palm Springs International Film Festival 2017'

'Official Selection 38th Durban International Film Festival 2017'


'Official Selection 40th Portland International Film Festival 2017'

'Official Selection 41st Cleveland International Film Festival 2017'

'Official Selection 57th Zlin International Film Festival 2017'

'Official Selection 20th Shanghai International Film Festival 2017'

Official Selection 14th Stuttgart Indian Film Festival 2017'

'Official Selection 11th London Indian Film Festival (BFI Educational Screening) 2017'

'Official Selection 40th Asian American International Film Festival 2017'

'Official Selection 20th Zanzibar International Film Festival 2017'

'Official Selection 17th ReelWorld Film Festival 2017'

‘Official Selection 35th Carrousel International Film Festival 2017’

Subscribe to receive free email updates: