जिया वाडकर म्हणतेय परी हूँ मैं

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची कन्या जिया वाडकर त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवीत पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. योगायतन फिल्मसची निर्मिती असलेल्या परी हूँ मैं या आगामी मराठी चित्रपटासाठी जियाने गाणं गायलं आहे. या चित्रपटातील ‘मोठ्या मोठ्या लाटांवरी आता तरी पोहू दे’... ‘चमचमणारी स्वप्न सारी आता खरी होऊ दे’... हे टायटल सॉंग जिया हिच्या सोबत मंदार पिळवलकर याच्या आवाजात नुकतंच ध्वनिमुद्रित करण्यात आलं.
मुलगी आणि वडिलांचं नातं हे खूप लाघवी आणि हळवं असतं. अव्यक्त तरी खूप काही बोलून जाणारं! वडिल मुलीचं नातं अधोरेखित करणारं सचिन पाठक लिखित हे गीत मनाला नक्कीच स्पर्शून जाईल असा विश्वास संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी व्यक्त केला. प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल असं सांगत, गाणं गाण्यातला आनंद जियाने याप्रसंगी बोलून दाखवला.
रोहित शिलवंत दिग्दर्शित परी हूँ मैं या आगामी चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. नंदू माधव,देविका दफ्तरदारश्रुती निगडेफ्लोरा सैनी हे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. योगायतन’ ग्रुपचे चेअरमन डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि संचालिकाशीला राजेंद्र सिंह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. संगीत समीर साप्तीस्कर यांचे आहे. चित्रपटाचे छायांकन रोहन मडकईकर यांनी केले आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत सांभाळीत आहेत. सहनिर्माते संजय गुजर असून क्रिएटिव्ह प्रोड्युसर कुणाल मेहता आहेत.

Subscribe to receive free email updates: