तेजस्विनी पंडितची अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास भेट तुम्हाला हे माहितीये का? - तेजस्विनी पंडितच्या आई ज्योती चांदेकर यांनी बिग बी सोबत काम केलंय!

ये रे ये रे पैसा च्या टीमने 'अमिताभ बच्चन' ह्यांची भेट घेतली जिथे चित्रपटाच्या स्टारकास्टने बिग बी सोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला. परंतु ये रे ये रे पैसाच्या बबलीकडे म्हणजेच तेजस्विनी पंडितकडे बिग बी साठी एक खास गोष्ट दाखवण्यासारखी होती.  
तेजस्विनी पंडीतने आपल्या आईचा एक व्हिडीओ बिग बीना दाखवला परंतु हा व्हिडीओ होता खास! कारण या व्हिडीओमध्ये तेजस्विनीच्या आईंसोबत म्हणजे ज्योती चांदेकरांसोबत खुद्द अमिताभ बच्चन होते. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या  बी आर इशारा दिग्दर्शित 'एक नजर' ह्या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्या सावत्र आईची भूमिका केली होती. आणि त्या वेळेस त्या अवघ्या १६ वर्षांच्या होत्या. 
तेजस्विनी पंडितने बिग बीसोबतच्या या भेटीत बिग बीना  एक नजर या चित्रपटातली एक व्हिडीओ क्लिप दाखवली, ज्यात ज्योती चांदेकर आणि अमिताभ बच्चन यांचे संभाषण असलेले दृश्य आहे. हि व्हिडीओ क्लिप स्वतः ज्योती चांदेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर हि पोस्ट केली आहे. 
स्वतःच्या आईचा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांना दाखवणे आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल हे पाहणे, हे सगळी इव्हेंट वर्णन करण्यासारखी आहे त्याबाबत तेजस्विनी सांगते, ''मी हे फार आधी प्लॅन केलं होतं की  जेव्हा मी अमिताभजींना भेटेन तेव्हा  मी त्यांना माझ्या आईसोबतचा त्यांचा हा व्हिडीओ नक्की दाखवणार. माझ्या आईची पण हि खूप इच्छा होती. पण त्यांना भेटायला जाताना मी थोडी नर्व्हस  होते. बिग बींकडे एवढा वेळ असेल का? इतके मोठे कलाकार किती लोक त्यांना भेटतं  असतील. माझा हा व्हिडीओ पाहण्यात त्यांना कितपत रस असेल मला माहित नव्हते. म्हणून मी तिथे पोचल्यावर 'ये रे ये रे पैसा' बाबतची चर्चा करून झाल्यावर त्यांची परवानगी घेतली. आणि मग त्यांना हा व्हिडीओ दाखवला. माझ्या आईसोबत त्यांनी एका चित्रपटात काम केलंय हे मी सांगितल्यावर त्यांना कौतुक वाटलं. त्यांना चित्रपटाचं नाव आठवत नव्हतं. पण हा एक सुंदर नॉस्टॅल्जिया दिल्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद म्हटलं . He was quiet happy." 
तेजस्विनी पुढे म्हणाली, "मी त्यांना हे हि सांगितलं कि माझे बाबा तुमचे फार मोठे फॅन होते. जेव्हा कुली चित्रपटाच्या शूटिंग वेळेस तुमचं मेजर अकॅसिडेन्ट झालेलं तेव्हा माझ्या बाबांनी सिद्धिविनायकाकडे साकडं घातलेलं. आणि तुम्ही बरे झालात तसे बाबा चालत सिद्धिविनायकाला गेले आणि सोन्याच्या दुर्वा गणपतीला अर्पण केल्या होत्या. आमची तेव्हा सोन्याच्या दुर्वा घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती नव्हती, पण बाबा तुमचे खरंच फार मोठे फॅन होते. त्यांना हे ऐकून फार कौतुक आणि समाधान वाटलं." 
P.S. The video clip of Amitabh Bachchan and Jyoti Chandekar working together is attached with this mail along with photographs of Tejaswini's visit! 

Subscribe to receive free email updates: