१५ आणि १६ जानेवारीला दुपारी १.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर
मुंबई, ५ जानेवारी, २०१७ : नवे खमंग, चविष्ट, खुशखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. खरतरं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी अन्नावर प्रेम असावे लागते तरच त्या पदार्थांवर न्याय होतो. बऱ्याच लोकांना खाण्याची आवड नसून दुसऱ्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून देण्याची आवड असते. पण एखादा पदार्थ चांगला आहे कि वाईट याची पारख एक उत्तम खवय्याच करू शकतो. कलर्स मराठी अश्याच खवय्यांसाठी एक रुचकर कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी घेऊन आला “आज काय स्पेशल”. या कार्यक्रमामध्ये प्रशांत दामलेमहाराष्ट्रातील खवय्यांच प्रतिनिधीत्व करत असून बरेच सुप्रसिध्द कलाकार या कार्यक्रमामध्ये येऊन गेले ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रुचकर पदार्थ करून प्रेक्षकांची मने जिंकली. मकर संक्रातीनिमित्त मराठी मनोरंजन क्ष्रेत्रातील प्रेक्षकांचा लाडका शशांक केतकर त्याच्या पत्नी प्रियांका सह कार्यक्रमास उपस्थित होता. शशांक आणि प्रियांकाचे नुकतेच लग्न झाले असून त्यांची ही पहिलीच मकर संक्रात आहे. कार्यक्रमामध्ये दोघांनी प्रशांत दामले यांच्याशी बऱ्याच मनमोकळ्या गप्पा मारल्या. तेंव्हा यांची धम्माल मस्ती बघायला विसरू नका मकर संक्रांत विशेष भागामध्ये १५ आणि १६ जानेवारीला दुपारी १.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर.
या विशेष भागामध्ये शशांक आणि प्रियांकाने चविष्ठ, रुचकर असे पदार्थ देखील बनवले. शशांकने भोगीची भाजी तर प्रियांकाने तिळगुळचे लाडू बनवले. पदार्थ बनवताना प्रशांत दामललेंनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील यांनी दिली. शशांकला कुकिंगची खूप आवड आहे आणि त्याने बनवलेले मोमोज आणि चायनीज प्रियांकाला खूप आवडते तर प्रियांकाला केक बनवायला खूप आवडते. याचबरोबर शशांक प्रियांकचं कौतुक करताना दिसला... त्याला प्रियांकाची स्माईल खूप आवडते असं तो म्हणाला. याचबरोबर दोघांनी एकमेकांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी देखील सांगितल्या जसे शशांक म्हणाला प्रियांकाला खाण्याची आवड आहे त्यामुळे ती जंक फूड खूप खाते तिने फिटनेस कडे लक्ष द्यायला पाहिजे तर प्रियांकाची इच्छा आहे शशांकने भरपूर काम करावं म्हणजे तिला देखील त्याच्यासोबत खूप फिरता येईल. लग्नाच्या वेळेसची आठवण विचारली असता प्रियांका म्हणाली तिला केळवण खूप आवडलं कारण, या दरम्यान आवडीच्या अनेक गोष्टी खायला मिळतात. प्रियांकाला मकर संक्रातीच्या विशेष भागानिमित्त काळ्या रंगाची साडी भेट म्हणून दिली.
अश्या अनेक गोष्टी जाणून घेण्यसाठी बघा “आज काय स्पेशल” १५ आणि १६ जानेवारीला दुपारी १.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर.